पैठण, (प्रतिनिधी) : मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी पैठण तालुक्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजता 17 मतदान केंद्रावर मतदान पार पडले. सकाळपासूनच पदवीधर मतदारांचा निरुत्साह दिसून आला होता.बारा वाजेपर्यंत अत्यंत संथ गतीने केवळ 22.67 टक्के मतदान झाले होते.पैठण तालुक्यात एकूण 5975 मतदार आहे यामध्ये 4744 पुरुष तर 1231 महिला मतदार आहेत.
यापैकी3786 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे या मध्ये पुरुष 3155 तर केवळ 628
महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तालुक्यात एकूण 63.31 टक्के मतदान झाले आहे. तालुक्यात शांततेत मतदान पार पडले आहे. कुठेही गैरप्रकार घडला नाही.
महायुतीच्या उमेदवाराच्या मतदान केंद्रावर महायुतीचे थोटे, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष दत्ता गोर्डे, नगरसेवक जितू परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष किशोर तावरे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे,लक्ष्मण औटे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे विधानसभा अध्यक्ष विनोद तांबे, ज्ञानेश्वर कापसे, नितीन पोकळे, विधी आघाडीचे राहुल बाबर, माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, लक्ष्मण पसारे, विजय चाटूपळे, महेश जोशी, शिवाजी तुपे,लक्ष्मीकांत पसारे, रमेश पाठक, योगेश धर्माधिकारी, सतीश आहेर,संतोष दापटे, बंडू आंधळे, विशाल पोहेकर, सुनील वीर,कल्याण मगरे, अश्विनी लखमले, सुचित्रा जोशी मतदान बूथ केंद्रावर तैनात होते. तर महाविकास आघाडीचे इंदिरा काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दिलीप भोसले, लुकाध्यक्ष रमेश मुळे, निमेश पटेल, किशोर दसपुते, संभाजी काटे, रमेश गव्हाणे, उमेश पंडुरे, विशाल वाकचौरे, हसदुद्दीन कट्यारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते बूथ केंद्रावर तैनात होते.















